
चंद्रकोर बिंदू, वारली कला, संतभूमी अशांचा संगम असलेला एमटीडीसीचा नवीन लोगो तयार करण्यात आला आहे. या लोगोचे अनावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याचबरोबर नाशिक बोट क्लबच्या लोगोचेही यावेळी अनावरण झाले. राज्यात पर्यटनातून रोजगार निर्मितीला येत्या काळात चालना देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी पर्यटन मंत्र्यांनी दिली.
एमटीडीसीच्या नवीन लोगोमधून महाराष्ट्राची संस्पृती दिसते असे सांगून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, कोरोनोत्तर काळात पर्यटन क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव आहे. त्या पार्श्वभूमीवर एमटीडीसीचे राज्यातील रिसॉर्टस् आणि विविध उपक्रमांची भूमिका महत्त्वाची आहे.
पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, सध्याच्या काळात पर्यटन विभाग व एमटीडीसी एकत्रितपणे नवनवीन उपक्रम राबवून राज्यातील पर्यटन आणि आदरातिथ्य व्यवसायाला चालना देत आहेत. एमटीडीसीचा नवीन लोगो हा राज्याची संस्पृती, शौर्य, निसर्ग संपन्नता दाखवणारा आहे. पर्यटकांना यातून महाराष्ट्रातील पर्यटनाची नवीन ओळख होईल या निमित्ताने एमटीडीसीच्या नवीन फिडबॅक क्यूआर कोडचे अनावरण झाले. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी एअर बीएनबीसोबत सामंजस्य करारही करण्यात आला.
- या कार्यक्रमाला पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, इंडियन स्पूल ऑफ डिझाईन अॅण्ड इनोव्हेशनच्या प्रमुख इंदू शाहनी, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर, एमटीडीसीचे सरव्यवस्थापक दिनेश कांबळे उपस्थित होते. एअर बीएनबीचे व्यवस्थापक अमनप्रित बजाज हे ऑनलाईन सहभागी झाले होते.



























































