फक्त 3 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश; सुमारे 7 हजार टक्क्यांचा रिटर्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर बाजारातील गुतंवणूक जोखमीची असते. मात्र. काहीजण असे शेअर निवडतात की त्यामुळे ते मालामाल होतात. फक्त 3 रुपयाच्या एका शेअरमुळे अनेक गुतंवणूकदार मालामाल झाले आहेत. या एक शेअरमुळे अनेकजण कोट्याधीश झाले आहेत. गेल्या काही दिवसापासून बाजारात घसरण होत असून अनेकजणांचा पैसे बुडाले आहेत. मात्र, दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांना अशा घसरणीने फारसा फरक पडत नाही. तसेच काही गुतंवणूकदार बंपर फायदा देणारे शेअर निवडतात आणि मालामाल होतात. असाच एक शेअर आहे, ज्याने अनेकांना कोट्याधीश बनवले आहे.

V-Gaurd Industries Limited चा शेअर 13 वर्षांपूर्वी शेअर बाजारात आला होता. त्यावेळी त्याचा एक शेअर फक्त 3 रुपयांना होता. त्या तुलनेत आता या शेअरच्या किमतीत 7,066 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना एनएसईवर हा शेअर 214.90 रुपयांवर पोहचला होता. तर एकदा हा शेअर 185 रुपयांपर्यंत जाऊन आला आहे. ही त्याची ऑल टाईम हायची किंमत आहे.

हा शेअर बाजारात आल्यावर 2009 मध्ये 1500 रुपयांची गुंतवणूक केलेल्यांचे आज काही कोटी रुपये झाले आहेत. या शेअरमध्ये गुतंवणूक करत हे गुतंवणूकदार 13 वर्षात कोट्याधीश झाले आहेत. फक्त 1500 रुपयांच्या गुतंवणुकीवर आज काही कोटी रुपये त्यांना मिळाले आहेत. मिडकॅप असलेल्या या कंपनीचा एमकॅप सध्या 9,331 कोटी रुपये आहे. कंपनीने डिसेंबरच्या तिमाहीतील अहवाल जारी केला आहे. या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 31 टक्क्यांची घसरण होत तो 53.92 कोटींवर आला आहे. तसेच कंपनीचा महसूल वर्षभरापूर्वी 935.04 कोटी होता. त्यात वाढ होत तो आता 967.38 कोटी झाला आहे.

कंपनीच्या नफ्यात घट झाली असली तरी अनेक गुतंवणूकदार यात गुतंवणूक करत आहेत. काही ब्रोकरेज फर्मने हा शेअर 280रुपयांपर्य जाईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे अजूनही या शेअरमध्ये काही गुतंवणूकदार पैसे गुंतवत आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील व्यवहार जोखमीचे असले तरी योग्य शेअर निवडत त्यात दीर्घकाळ गुतंवणूक केल्यास त्याचा नक्कीच फायदा दिसून येतो.