आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकर क्रिकेटपटू रोहित शर्माचा विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलोनीमधील वृक्षतोडीविरोधात शिवसेनेने कठोर भूमिका घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडूनही यापुढे वृक्षतोड करू नका, असा आदेश देण्यात आला. या वृक्षतोडीविरोधात हिंदुस्थानी संघातून खेळणारा मुंबईचा क्रिकेटपटू रोहीत शर्मा यानेही पाऊल उचलले आहे. रोहीत शर्माने सोशल साईटवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, वृक्षतोड ही अत्यंत वाईट आहे. वृक्षांमुळे परिसर हिरवागार राहतो. वातावरणही आल्हाददायक असते. एवढेच नव्हे तर वृक्षतोडीमुळे जनावरांनाही राहायला जागा शिल्लक राहणार नाही.