
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईला जाणाऱया एका विमानात आरडीएक्स असल्याच्या बॉम्बच्या अफवेने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ झाली होती. संपूर्ण विमानाची तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले आहे.
दुबईला जाणाऱया एका चार्टर्ड विमानात आरडीएक्स ठेवला असल्याचा एक निवावी कॉल मुंबई पोलिसांच्या पंट्रोल रूमला प्राप्त झाला होता. या कॉलनंतर ही माहिती विमानतळावरील सीआयएसएफसह सहार पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेसह एटीएसचे अधिकारी सहार पोलिसांसह घटनास्थळी रवाना झाले होते, या पथकाने बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या मदतीने संपूर्ण विमानाची तपासणी केली. मात्र पोलिसांना कुठेही संशयास्पद वस्तू सापडली नाही. आरडीएक्स बॉम्ब असल्याची ती अफवा असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. हा कॉल कुठून आला होता, तो कोणी केला होता, कॉल करण्यामागे संबंधित व्यक्तीचा काय उद्देश होता याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
































































