
मुंबई जिल्हा बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे संचालक आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी सोमवारी पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
प्रवीण दरेकर यांनी बँकेची निवडणूक लढविताना आपण मजूर असल्याची बनावट कागदपत्रे सादर करून निवडणूक लढवल्याच्या मुद्दय़ावरून आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती.
त्याचप्रमाणे बँकेमध्ये सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची तक्रारही शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांनीच पोलिसांकडे आर्थिक गैरव्यवहाराबाबतची तक्रार केली असून त्या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अधिक चौकशीसाठी बोलावले आहे




























































