पालिकेच्या तपासणीत 1,276 महिलांना ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मुंबईमध्ये स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या महाअभियानात 298 तपासणी केंद्रांवर एकूण 27 हजार 866 महिलांची स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान 1,276 महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची संशयित लक्षणे दिसून आली. या महिलांना त्यांच्या विभागातील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या जवळच्या रुग्णालयात मोफत मॅमोग्राफी तपासणी करून दिली जाणार असून आवश्यकतेनुसार त्यांच्यावर मोफत उपचार केले जाणार आहेत.