
मुंबईत कोरोनाचे प्रमाण घटले असून आज दिवसभरात कोरोनाचे 3 रुग्ण सापडले. या तिघांनाही कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. दरम्यान, आज 6 जण कोरोनामुक्त झाले. एकाही रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही तसेच गंभीर रुग्णांची संख्याही शून्यावर आली आहे.
सक्रीय रुग्णांची संख्या 48 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात दिवसभरात 22 रुग्ण सापडले तर 37 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे राज्यात एकही मृत्यू झाला नाही.



























































