
मुंबईत शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे 1,406 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 42 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1,235 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयाची संख्या आता 1 लाख 8,268 वर पोहोचली आहे.
मुंबईत 42 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 7 हजार 353 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 89 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 18 हजार 297 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 6 लाख 88 हजार 876 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 34,223 वर पोहोचली आहे.


























































