Mumbai crime news – 19 वर्षांपासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रॉबरीच्या गुन्ह्यात 19 वर्षांपासून फरार आरोपीला खार पोलिसांच्या निगराणी पथकाच्या अधिकाऱ्याने अटक केली. अनिल गोधा असे त्याचे नाव आहे. अनिलविरोधात 2007 साली जबरी चोरीचा गुन्हा नोंद होता. त्यात अनिल आणि त्याच्या एका सहकाऱयाला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताच तो पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहत होता. त्याच्याविरोधात अटकपूर्व जामीन वॉरंट काढले गेले. 19 वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. तो वांद्रे येथे आल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक धापटे, गुरव, पोफळे, शेख, ठोंबरे यांच्या पथकाने सापळा रचून अनिलला ताब्यात घेतले.