
धावत्या रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग करणाऱया दोघांना अंधेरी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. अनिकेत जैस्वाल आणि सूरजकुमार राजभर अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
तक्रारदार महिलेने गुंदवली येथून मालाडला जाण्यासाठी शेअरिंगची रिक्षा पकडली. प्रवासादरम्यान सूरजने त्यानंतर अनिकेतने महिलेशी नकोसे चाळे केले. त्यानंतर महिलेने अंधेरी पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. अंधेरी पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश रेड्डी यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक विजय बेळगे यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ, संखे, चव्हाण, पाटील, घरात, बाबर, राठोड, जाधव यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी पश्चिम द्रुतगती महामार्ग परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यावरून पोलिसांनी आज अनिकेत आणि सूरजला ताब्यात घेतले.

























































