कर्नल प्रसाद पुरोहित यांना दिलासा, आरोपमुक्त होण्याच्या याचिकेवर १६ जुलैला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित ले. कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. पुरोहित यांनी त्यांच्यावरील आरोप हटविण्यासाठी सादर केलेली याचिका न्यायालयाने दाखल करून घेत त्यावर येत्या १६ जुलैला अंतिम निर्णय देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या १६ जुलैला पुरोहित यांच्यावरील आरोप हटणार की नाही ते ठरणार आहे.

कर्नल प्रसाद पुरोहित यांनी त्यांच्यावर आरोप ठेवण्यापूर्वी बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली लष्कराची परवानगी घेण्यात आलेली नाही त्यामुळे आपल्याविरोधात खटलाच दाखल करता येत नाही. त्यामुळे मला आरोपमुक्त करावे, अशी मागणी परोहित यांनी सादर केलेल्या याचिकेतून केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एम. मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने पुरोहित यांची याचिका मान्य करत त्यावर येत्या १६ जुलैला अंतिम सुनावणी करणार असल्याचे न्यायालयात सांगतिले आहे.