
राज्यात पावसाचा जोर कायम असून मुंबईसह पालघर, रायगड रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण किनारपट्टीवर सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला राहील. समुद्रात साडेतीन ते साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
पालघर, ठाणे, रायगड जिह्यात मागील चोवीस तासांत सरासरी 96 ते 109 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत कुलाबा येथे 32. 8 मिमी आणि सांताक्रुझ येथे 2 मिमी पाऊस झाला आहे. तसेच पुंडलिका नदी व जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहात आहे.
मुंबईच्या किनारपट्टीवर अशा उसळणार लाटा
13 जुलै – 4.68 मीटर – सकाळी 11 वाजून 44 मि.
14 जुलै – 4.82 मीटर – दुपारी 12 वाजून 33 मि.
15 जुलै – 4.87 मीटर – दुपारी 1 वाजून 22 मि.
16 जुलै – 4.85 मीटर – दुपारी 2 वाजून 8 मि.
17 जुलै – 4.73 मीटर – दुपारी 2 वाजून 54 मि.
18 जुलै – 4.51 मीटर – दुपारी 3 वाजून 38 मि.
बुधवारी या जिल्ह्यांत रेड अॅलर्ट –
पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर
या जिल्ह्यांत ऑरेंज अॅलर्ट –
ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग

























































