मालाडमधील झोपडपट्टीला आग, एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
malad-fire

मुंबईतील मालाड येथील झोपडपट्टीत आग लागली असून यामध्ये एका 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. काही तासांच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. कुरारच्या वाघेश्वरी मंदिर परिसरातील ही घटना आहे. या आगीत 20 ते 25 घरं जळून नष्ट झाली आहेत. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार झोपडपट्टीतील घरांना लागलेल्या आगीत गॅस सिलिंडरचा देखील स्फोट झाल्याचं वृत्त आहे. या स्फोटात एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.