फिल्मसिटीबाहेर कचऱयाचा ढीग पाहून शशांक केतकर संतापला

‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने मुंबई महापालिकेला टॅग करत गोरेगावच्या फिल्मसिटीच्या परिसरात असणाऱया कचऱयाच्या ढिगावर संताप व्यक्त केला. व्हिडीओत शशांकने म्हटलेय, मुंबईची फिल्मसिटी बघायला देशातून, जगभरातून लोक येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा इतका सुंदर परिसर असावा ही कल्पना कोणाची? ही अवस्था, हे चित्र काही आजचे नाहीये मी गेल्या 10 वर्षात ती जागा कधीच स्वच्छ पाहिली नाहीये. इतकी उदासीनता का? हा सगळा कचरा उचलून पालिका कार्यालयासमोर ओतला तर आवडेल? येणारे पर्यटक, कलाकार आणि तिथे राहणारे नागरिक, सगळ्यांच्या माथी हा असला घाणेरडा परिसर का मारला आहे? असा खोचक सवालही शशांकने केला आहे.