पायावरून ट्रक गेल्याने कामगार जखमी; नेस्को येथील घटना 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगावच्या नेस्को प्रदर्शन पेंद्राच्या हॉलबाहेर झोपलेल्या कामगाराच्या पायावरून ट्रक गेल्याची घटना घडली आहे. रवींद्र यादव असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यादव हे साकीनाका परिसरात राहत असून ते रंगकाम करतात. गेल्या आठवडय़ात नेस्को प्रदर्शन पेंद्रात रविवारी प्रदर्शन संपल्याने यादव आणि त्याचा सहकारी दिनेश तेथे कामासाठी आले होते. दिवसभर काम करून थकल्याने ते दोघे हॉलच्या बाहेर झोपले होते. तेव्हा एक ट्रक यादवच्या पायावरून गेला. काही वेळाने यादवला जाग आली. तेव्हा दिनेशलादेखील इजा झाल्याचे यादवच्या लक्षात आले. यादवच्या काही सहकाऱ्यांनी त्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यादवच्या तक्रारीवरून वनराई पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस त्या ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.