Mumbai News – महापालिका इमारतीत बॉम्बस्फोटाची धमकी, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिका इमारतीत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी महापौर कार्यालयाला ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. 15 ऑगस्टपूर्वी महापौरांचे कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजारात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा उल्लेख ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. मेल प्राप्त होताच पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, या ईमेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा आणि काही व्यक्तींची नावे देखील आहेत. तसेच, मुलांना शाळेत न पाठवण्याचा आणि मेट्रोने प्रवास न करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सायबर पोलीस ईमेलचा आयपी ॲड्रेस, स्रोत आणि मेल पाठवणाऱ्याच शोध घेत आहेत.