
जेवणावरून झालेल्या क्षुल्लक वादातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाची हत्या केल्याची घटना मालाडमध्ये घडली. कल्पेश भानुशाली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. चिंचोली बंदर परिसरात गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पेश कुटुंबासह फास्ट फूडचा स्टॉल चालवायचा. कल्पेश भानुशाली आणि संजय मकवाना यांच्यामध्ये जेवणावरून वाद झाला. गुरुकृपा बार अँड रेस्टॉरन्टमध्ये कल्पेश आणि संजयमध्ये वाद झाला. यानंतर संजयने साथीदारांच्या मदतीने कल्पेशला मारहाण करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. कल्पेशच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या. यात कल्पेश गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलेय मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी मृत कल्पेशच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून मालाड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. अन्य आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. काही आरोपींचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत.