‘बेस्ट’ही आता येणार ‘ट्विटर’वर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best-fin

सामना प्रतिनिधी। मुंबई

वाहतूक आणि वीज सेवा पुरवणारी ‘बेस्ट’ही आता ट्विटरवर येणार आहे. यामुळे नागरिकांना आपल्या तक्रारी-समस्या ऑनलाइन नोंदवून तातडीने सोडवता येणार आहेत. याबाबत सोमवारी होणाऱया बैठकीत शिक्कामोर्तब होऊन कार्यवाही सुरू होईल. शिवसेना नगरसेवक आणि माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी ही मागणी केली आहे.

‘बेस्ट’ने नागरिकांसाठी ट्विटर सुरू करावे याबाबत नगरसेवक अनिल कोकीळ यांनी महाव्यवस्थापकांना पत्र दिले होते, मात्र याला दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर ट्विटर अकाऊंट सुरू करण्यासाठी सोमवारी ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ट्विटरवर शिक्कामोर्तब होईल.