Breaking News- मुंबई माहिममधील हाजी कासम इमारतीचा भाग कोसळला

मुंबईत सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत मुसळधार पावसाने माहिम येथे दुर्घटना घडली आहे. माहिम येथील मिया मोहम्मद छोटणी क्रॉस रोडवरील एका इमारतीचा भाग कोसळला आहे. हाजी कासम चाळीत ही दुर्घटना घडली असून दुर्घटनेत जिवीत किंवा वित्तहानीची अद्याप माहिती मिळालेली नाही.

बातमी अपडेट होत आहे.