मुंबई, पुण्यात प्री-डायबेटिस लोकांचे प्रमाण वाढतेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, पुण्यात ‘प्री डायबेटिस’ म्हणजेच मधुमेहाच्या काठावर असलेल्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. जीवनशैलीमुळे हे प्रमाण वाढत असून जीवनशैलीत वेळीच बदल न केल्यास अशा व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्यता आहे. इंडस हेल्थ प्लस या हेल्थकेअरमध्ये आघाडीवर असलेल्या कंपनीने केलेल्या तपासण्यांमधून ही माहिती समोर आली आहे.

इंडस हेल्थ प्लस या कंपनीने पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नगर, रत्नागिरी आणि नाशिक या शहरांमधील 18 वर्षांवरील व्यक्तींच्या तपासण्या केल्या. यात निमशहरी लोकवस्तींमध्ये प्री-डायबेटिसचे प्रमाण हे सर्वात जास्त म्हणजे 65 टक्के तर मोठय़ा शहरांमध्ये हे प्रमाणे 35 टक्के आढळले. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. तणाव, लठ्ठपणा, मद्यपान, जंक फुड, व्यायामाचा अभाव आणि मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारे शरीरात जाणारी साखर यामुळे प्री-डायबेटिस वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे मधुमेह होण्याचा दाट शक्यता असते. हे टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल, नियमित व्यायाम, चौरस आहार आणि धूम्रपान टाळणे आवश्यक आहे, असे इंडस हेल्थ प्लसचे जेएमडी आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर स्पेशलिस्ट अमोल नायकवडी यांनी सांगितले.