मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प; मंकीहिलजवळ दरड कोसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कर्जत

मुंबई पुणे रेल्वेमार्गावर ठाकूरवाडी- मंकीहिलदरम्यान सोमवारी दुपारी दरड कोसळल्याने मुंबई पुण्यादरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत दोन मजूर जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. महिन्याभरात या मार्गावर दरड कोसळण्याची ही चौथी घटना आहे. रल्वेमार्गावरून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड हटवल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक सुरू होणार आहे. मात्र, या मार्गावर दरड कोसळल्याने मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या काही एक्सप्रेस रद्द होण्याची शक्यता आहे.