‘सामना’चे माजी कर्मचारी गजानन बागवे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दैनिक ‘सामना’त 30 वर्षे सेवा करून निवृत्त झालेले कर्मचारी गजानन भिकाजी बागवे (75) यांचे त्यांच्या राहत्या घरी आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी लक्ष्मी आहेत. दिवंगत गजानन बागवे यांचे दहावे बुधवार, 17 जुलै रोजी सकाळी 7 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी, दादर येथे तर बारावे आणि तेरावे त्यांच्या कांदिवली येथील निवासस्थानी 19 जुलै रोजी होणार आहे.