विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन आवश्यक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटामुळे ऑनलाइन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन करणे गरजेचे आहे, असे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी स्पष्ट केले. ऑनलाइन शिक्षण धोरणासंदर्भात महाराष्ट्र शिक्षणसंस्था संचालक मंचाच्या शिष्टमंडळाने साबळे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

आनलाइन शिक्षण, शिक्षकांना तांत्रिक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचा सहभाग, पालकांचे समुपदेशन, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे मंचाचे कार्याध्यक्ष भाऊ कोरगावकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग करीत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा यावेळी भाऊ कोरगावकर यांनी केली तसेच भविष्यात मंचाच्या वतीने शिक्षण विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही सांगितले.