आयडॉलचे जानेवारी सत्राचे  प्रवेश सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) जानेवारी सत्राच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे. विविध अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना जानेवारी ते डिसेंबर 2023 च्या सत्रात प्रवेश घेऊन आपले शिक्षण पूर्ण करता येईल. या जानेवारी सत्रामध्ये विद्यार्थी बीए, बीकॉम, एमए, एमकॉम व एमए शिक्षणशास्त्र्ा या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतात.

जे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळे जुलै सत्रात प्रवेश घेता आला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची ही एक संधी आहे. अशा विद्यार्थ्यांनी आयडॉलमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी केले आहे. या जानेवारी सत्रामध्ये पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बीए व बीकॉमबरोबरच पदव्युत्तर प्रथम व द्वितीय वर्ष एमए व एमकॉममध्येही सेमिस्टर पद्धत सुरू करण्यात आली आहे. वर्ष 2022 मध्ये आयडॉललाही जानेवारी सत्राचे प्रवेश करण्यास यूजीसी मान्यता मिळाली असून यूजीसीने आयडॉलला जानेवारी 2026 पर्यंत सलग पाच वर्षांची मान्यता दिली आहे. ही मान्यता 20 अभ्यासक्रमासाठी देण्यात आलेली आहे.

  • एमए अभ्यासक्रमात मराठी, हिंदी व इंग्रजी हे भाषा विषय असून मानव्य व सामाजिकशास्त्र्ाामध्ये इतिहास, अर्थशास्त्र्ा, राज्यशास्त्र्ा व समाजशास्त्र्ा या विषयांत प्रवेश घेता येईल.
  • एमए शिक्षणशास्त्र्ा हे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. एमकॉममध्ये अकाऊंट्स व व्यवस्थापन असे दोन समूह विषय देण्यात आले आहेत.
  • अनेक महाविद्यालयांत तृतीय वर्षी बी.ए.मध्ये मानसशास्त्र्ााचे सहा पेपर उपलब्ध नसल्याने विद्यार्थी मानसशास्त्र्ाापासून वंचित राहतात. या वर्षीपासून आयडॉलमध्ये मानसशास्त्र्ााचे सहा पेपर सुरू करण्यात येत आहेत.
  • विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावरून प्रवेश घ्यावा.