
‘कोरोना’ ला हरवण्याठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे आवाहन केल्यानंतर मुरबाडकरांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला. गट विकास अधिकारी विश्वनाथ यांनी आयोजित केलेल्या शिबिरात १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्त कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे.
मुरबाड पंचायत समिती कार्यालयात गुरुवारी हे रक्तदान शिबीर पार पडले. ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्त संकलनाचे काम ठाण्यातील कै.वामनराव ओक रक्तपेढीने केले आहे. ‘कोरोना’ला हरवण्यासाठी रक्तदानाची पुन्हा गरज पडल्यास आम्ही मदतीला धावून येऊ असा विश्वास मुरबाडवासीयांनी केला आहे.



























































