बीडमध्ये तरूणाचा निर्घुण खून; आरोपी फरार

बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या चऱ्हाटा फाटा परिसरातील शिवदरा रस्त्यावर प्रकाश गायकवाड या तरूणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. त्या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

बीड शहराजवळील असलेल्या शिवदरा रस्त्यावर डोंगर आणि मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना पहाटे मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीचे नाव प्रकाश गायकवाड असून तो वाहनचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रकाशच्या डोक्यात दगड घालून आणि दगडाने ठेचून त्याचा निर्घुण खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अंकुशनगर भागामध्ये राहणाऱ्या प्रकाशचा खून अज्ञात मारेकऱ्यांनी केला आहे. खुनाचा छडा लावण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या