
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे शामा पहिलवान उर्फ शाम रघुनाथ खोलापुरे (40) यांचा सोमवारी दुपारी खून करण्यात आला आहे. धार्मिक वादातून हा खून झाल्यामुळे परतवाडा व अचलपूर या जुळ्या शहरात पोलिसांनी संचारबंदी लावली आहे.
सोमवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान परतवाडा येथील मुगली टिंबर डेपो जवळ जुगार चालू होता. या जुगारातच शामा पहेलवान सुध्दा सहभागी होता. जुगारातून शामा पहेलवानचा वाद झाल्यामुळे काही तरुणांनी त्याचा खून केला. घटनेची माहिती अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात पसरताच तनाव निर्माण झाला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोणातून परतवाडा पोलिसांनी दोन्ही शहरात संचारबंदी लावली आहे. शामा पहेलवानचा खून करणारे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

























































