
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या एका वृद्ध दांपत्याची हत्या करण्यात आली आहे. नानक मखिजानी आणि दया मखिजानी अशी या दोघांची नावे आहेत. उशीने तोंड दाबून या दोघांची हत्या करण्यात आली आहे. खार पोलीस घटना स्थळी पोहोचले असून त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. हे कृत्य चोरीच्या उद्देशाने करण्यात आलं असावं असा संशय आहे. ज्या पद्धतीने ही हत्या करण्यात आली आहे ते बघता घराची व्यवस्थित माहिती असलेल्यानेच ही दुहेरी हत्या केल्याचा अंदाज आहे.






























































