
योजना प्रतिष्ठान आणि शिवगंधार निर्मित आणि गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या सहकार्याने आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवार, 10 जुलैला दुपारी साडेतीन वाजता मुंबई मराठी साहित्य संघ येथे भक्तीसंगीतावर आधारीत अभंगवाणी मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई शिरुरकर यांचे अभंग गायिका योजना शिवानंद सादर करणार आहेत. मैफिलीची संकल्पना, संहिता, निर्मिती, निरुपण, लेखन, योजना शिवानंद यांची आहे. अभंगाचे निरुपण उमा खोलगडे करणार असून सहगायन सानिका देवधर करणार आहेत. संगीतकार डॉ. सुनील कट्टी, पं. केदार पंडित आणि पं. शिवानंद पाटील यांनी ही अभंगवाणी संगीतबद्ध केली आहे. गायक निरंजन लेले यांनी संगीत संयोजन केले आहे.






























































