सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी शब्दबद्ध केलेल्या अजरामर गीतांची स्वरसंध्या आयोजित करण्यात आली आहे. ‘शब्द सुरांचे चांदणे’ असे या मैफलीचे नाव असून ही मैफल उद्या, रविवारी रात्री 8.30 वाजता विलेपार्ले पूर्व येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात पार पडणार आहे.
नचिकेत देसाई, धनंजय म्हसकर, केतकी चैतन्य, धनश्री देशपांडे हे कलाकार गाणी सादर करणार असून प्रशांत लळित, दर्शना जोग, प्रणव हरिदास, सूर्यकांत सुर्वे, प्रभाकर मोसंबकर, अभिजीत सावंत हे साथसंगत करतील. संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे असून निवेदन अनघा मेडक करतील. सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशीष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही मैफल रसिकांसाठी विनामूल्य आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली.

























































