ऑनलाइन कार्यक्रमांवर भर

499

>> अतुल दाते

ज्यावेळी सरकारने कोरोना काळातली बंदी जाहीर केली तेव्हा कोणी कोणाला भेटू शकत नव्हता, कोणी कोणाला भेटायला कुठे जाऊ शकत नव्हता. लोकांमध्ये राहण्याची सवय होती. त्यामुळे थोडा त्रास झाला. त्यामुळे घरी राहून लोकांसाठी कसे कार्यक्रम करता येतील याचा विचार केला.

आरोग्याची जपणूक या काळात करण्यासाठी सरकारने सांगितलेले नियम आम्ही ऐकतो. वाफ घेणे, गरम पाणी पिणे, मास्क लावणे, घराबाहेर न जाणे हे सगळे नियम पाळतो.

नवीन लेख वाचतो. ज्यांना कधी ऐकलं नाही, वाचलं नाही अशांबद्दल वाचतो, ऐकतो. सध्याच्या महामारीच्या काळात आणि नंतरही आपल्या आरोग्याची काळजी काळजी घ्या. मास्क वापरा, स्वच्छता राखा, सॅनिटायझरचा वापर करा. या सगळ्या गोष्टी नियमित केल्या तर आपण जिवंत राहू शकतो.  

नवे ऑनलाइन कार्यक्रम…

वेगळ्या प्रकारचे गाण्यांचे ऑनलाइन कार्यक्रम सादर केले. त्यामुळे आनंद मिळू लागला. नवीन गायकांना गाण्याची संधी दिली. ‘ललना मना’ या कार्यक्रमाची निर्मिती केली. यामध्ये संगीतकार, दिग्दर्शिका, गायिका, संगीतकार, कवयित्री यांनी सादर केलेल्या कलाकृतींचा सहभाग आहे, महदंबेच्या काळापासूनच्या स्त्राr कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्टय़ असं की, फेसबुक आणि यूटय़ूबवरून नव्या गायक कलाकारांना कला सादर करण्याची संधी कोरोना काळात मिळाली. तसेच शेवटी ‘कर’ येणाऱया आडनावाच्या 12 कवींवर आधारित त्यांनी रचलेल्या कविता आणि गाण्यांवर आधारित ‘तेथे कर माझे जुळती’ हा बहारदार ऑनलाइन कार्यक्रम सादर केला. ‘ललना मना’ आणि ‘तेथे कर माझे जुळती’ हे दोन्ही कार्यक्रम यूटय़ूबवर उपलब्ध आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या