इसा संघटनेचे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) संघटनेच्या वतीने .25 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी इंग्रजी शाळा बंद आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खोमणे यांनी दिली.

गेल्या पाच-सहा वर्षांपासून इंग्रजी शाळांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. राज्यशासन आर टी ई 25% प्रवेशांसाठी परतावा अदा करण्यात अपयशी ठरले आहे. गेल्या चार-पाच वर्षांत थकीत फि परतावा देण्यासाठी शासनाने 1 नोव्हेंबर 2011 रोजी शासन आदेशद्वारे जाचक अटी लादल्या आहेत. तो आदेश म्हणजे इंग्रजी शाळावर एक प्रकारे इन्स्पेक्टर राज लादण्यात आले. गेले सहा वर्ष प्रवेश देताना सर्व शाळा पात्र होत्या. परंतु आता फी परतावा देताना त्यांची पात्रता तपासणी करणे म्हणजे इंग्रजी शाळावर अन्याय आहे. आणि याचबरोबर इंग्रजी शाळावर समाजकंटकांकडून वारंवार तोडफोड हल्ला करण्याची घटना वाढत आहेत.

शाळेत महिला कर्मचारी लहान मुले असतात. त्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून राज्यात शाळा सुरक्षा कायदा तात्काळ लागू करण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसह शासनाच्या इंग्रजी शाळा विरोधी धोरणाच्या निषेधार्थ ईसा संघटनेने एकदिवशीय इंग्रजी शाळा बंदची हाक दिलेली आहे. 25 फेब्रुवारी रोजी ईसा संघटनेच्या राज्यातील 4400 इंग्रजी शाळा या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या संघटनेच्या प्रमुख मागण्या 1 नोव्हेंबर 2018 शासन निर्णय मागे घेऊन 2012 ते 2019 पर्यंतच्या आर टी ई 25 % फी परतावा तातडीने अदा करावा. राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा सुरक्षा कायदा करण्यात यावा.18 नोव्हेंबर 2013 च्या शासन आदेशामध्ये दुरुस्ती करण्यात यावी. शालेय विद्यार्थी वाहतूकीसंदर्भामध्ये मुख्याध्यापकांऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकावर जबाबदारी सोपवावी. स्वयअर्थ सहित तत्त्वावर दर्जावाढ प्रस्तावासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु करावी. आदी मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. याराज्यव्यापी आंदोलनात सर्व इंग्रजी शाळांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खोमणे यांनी केले आहे.