नागपूर पोलिसांचे हायटेक पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर शहरात होणाऱया हत्यांचा पॅटर्न ओळखण्याकरिता नागपूर पोलीस आता मनोवैज्ञानिक, स्वयंसेवी संस्थेची मदत घेणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी आज दिली. शहरात अवैधपणे टेरेस बार सुरू आहेत. अशा प्रकारच्या व्यवसायाची कुठलीही परवानगी कुणालाही दिलेली नाही. त्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या बार सर्व्हीस कुठेही आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी दिला आहे. नागपूर शहरात गुन्हेगारी आणि हत्यांचे प्रमाण अधिक आहे. त्याचे मनोवैज्ञानिक काही कारण आहे का ते समजण्याकरिता मनोवैज्ञानिकांची मदत घेतली जाईल. सायबर गुन्हेगारी, आर्थिक गुन्हे, फसवणूक आदींसंदर्भात सायबर सॉफ्टवेअर तयार करण्यात येईल. नागरिकांना जागृत करण्याचे काम करू, असेही आयुक्त सिंगल यांनी सांगितले.