नालासोपार्‍यात प्रियकर आणि अल्पवयीन प्रेयसीने जीवन संपवले

नालासोपार्‍या प्रेमी जोडप्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी नालासोपारा पश्चिम येथील नाळे गावातील बेणापट्टी गावात ही घटना घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अनिलकेत जाधव (२०) हा तरूण अर्नाळा येथील सहजीवन पाडा परिसरात राहत होता. त्याचे नाळा बेणापट्टी मधील उज्जवा डुबला (१७) नावाच्या तरुणीशी प्रेमसंबध होते. बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास दोघे नाळे येथील उज्वलाच्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांना मयत घोषीत केले. त्यानी विष प्राशन करून आत्महत्या केली असावी अशी शक्यता नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी व्यक्त केली आहे. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे