
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले हे ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत. ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
INDIA आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महत्त्वाची आहे. त्यामुळे आघाडीतील नेते पक्षप्रमुखांची भूमिका, त्यांची मतं समजून घेण्यासाठी आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेत असतात. आज भेटीत नक्की कोणत्या गोष्टीवर चर्चा होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र लवकरच याची माहिती सर्वांसमोर येण्याची शक्यता आहे.


























































