नानापेठेत घरफोडी, सव्वा लाखांचे दागिने चोरीला

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील ५० हजारांची रोकड आणि दागिने मिळून १ लाख २७ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नानापेठेतील  राजेवाडीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिला कुटूंबियासह नाना पेठेतील राजेवाडीत राहायला आहे. दोन दिवसांपुर्वी त्या कामानिमत्त बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून १ लाख २७ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जोरे अधिक तपास करीत आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या