अखेर ‘तो’ आदेश आला, शिक्षकांमध्ये समाधानाची लाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

गेल्या महिनाभरापासून प्रतिक्षेत असलेल्या नांदेड जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे ऑनलाईन आदेश सोमवारी त्या-त्या तालुक्यांना देण्यात आले. गट शिक्षण अधिकारी व शाळांचे मुख्याध्यापक यांना शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्पâत राज्य शासनाने केलेल्या बदल्यांचे आदेश देण्याची प्रक्रिया सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होती. गेल्या दोन वर्षापासून या बदल्या रखडल्या होत्या.

नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी राज्य शासनाच्या मार्पâत ऑनलाईन पध्दतीने जारी करण्यात आले. यात अर्धापूर तालुक्यातील १६२, भोकर तालुक्यातील २२१, बिलोली तालुक्यातील १९७, देगलूर तालुक्यातील २६६, धर्माबाद तालुक्यातील १६०, हदगाव तालुक्यातील ३४२, हिमायतनगर तालुक्यातील १३६, कंधार तालुक्यातील ३५४, कि नवट तालुक्यातील ३९८, लोहा तालुक्यातील ३६९, माहुर तालुक्यातील १३०, मुदखेड तालुक्यातील १७७, मुखेड तालुक्यातील ४३७, नायगाव २४८, नांदेड १६२, नांदेड एम.सी. ३३, उमरी ११७ अशा ३,९५९ मराठी माध्यमांच्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर अर्धापूर तालुक्याच्या उर्दु शिक्षकांच्या १६, भोकर २४, बिलोली १७, देगलूर २०, धर्माबाद ९, हदगाव ३६, हिमायतनगर ६, कंधार ९, किनवट १२, लोहा १३, माहुर ४, मुदखेड ५, मुखेड १७, नायगाव २३, नांदेड २, नांदेड एम.सी.१, उमरी ४ अशा १५२ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश शासनाने पाठवले असून, त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील १०९५ शिक्षकांना विस्थापित ठेवण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिली आहे.

गत अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा असलेला बदली प्रक्रियेतील हस्तक्षेप संपुष्टात आला असून शिक्षकांच्या चेहऱ्यावर या बदली प्रक्रियेमुळे हास्य फुलल्याचे पहावयास मिळाले. या प्रक्रियेत शिक्षक नेते संबोधल्या जाणाऱ्या अनेकांना किनवट, माहुर तसेच अन्य ठिकाणचा रस्ता दाखविण्यात आला आहे. बदल्यांचे आदेश संकेतस्थळावर प्राप्त होताच अनेक शिक्षकांनी जिल्हा परिषदेत धाव घेतल्याने जिल्हा परिषदेला यात्रेचे स्वरूप आले असल्याचे पहावयास मिळाले आहे.