कुसुमाग्रज प्रतिष्ठान विश्वस्तपदी नरेंद्र चपळगावकर

188

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी निवृत्त न्यायाधीश, प्रसिद्ध साहित्यिक नरेंद्र चपळगावकर, नाटककार जयंत पवार, नाशिकचे ऍड. दत्तप्रसाद निकम आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी संचालक प्रकाश वाजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या तीन जागा रिक्त होत्या, तर अशोक हांडे यांच्या विश्वस्त पदाची मुदत संपली होती. प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत विश्वस्तपदी वरील चार मान्यवरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी दिली.

निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर हे वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध नाटककार, नाटय़ समिक्षक जयंत पवार यांच्या अनेक नाटय़कृती प्रसिद्ध  असून, त्यांनी कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती समितीवर काम केले आहे. ऍड. दत्तप्रसाद निकम हे नाशिकच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात, तसेच प्रतिष्ठानच्या कार्यात नेहमीच सहभागी असतात. सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाजे यांनी मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या