डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींचे वकील सरकारी समितीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचे वकील असणारे ऍड. प्रकाश साळशिंगीकर सरकारी समितीवर वर्णी  लावण्यात आली आहे. राज्य सरकारने गठित केलेल्या ‘आंतरधर्मीय विवाह – परिवार समन्सवय समितीमध्ये  साळशिंगीकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणात सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ. विरेंद्रसिंह ताकडे, ऍड संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भातील खटला अद्यापही सुरू असताना आरोपींची न्यायालयात बाजू मांडणारे ऍड. प्रकाश साळशिंगीकर यांचा चक्क सरकारी समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. महिला व  बालविकास  विभागाने 13 डिसेंबर रोजी यासंदर्भातील शासन आदेश काढला आहे.