पाहा, नरकासुर दहनाने गोव्यात दीपोत्सवाला सुरुवात!

310

सामना प्रतिनिधी । पणजी

गोव्यात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे गोव्यात नरकासुर दहनापासून दिवाळी साजरी करण्यास सुरुवात होते. देशभरात दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते. मात्र गोव्यात नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचे दहन करून दिवाळी साजरी केली जाते. आज देखील नरकासुराचे दहन केल्यानंतर अभ्यंग स्नान करून सगळ्यांनी फराळाचा आस्वाद घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

सोमवारी सायंकाळ पासून गोव्यात सर्वत्र भले मोठे नरकासुर बनवून ते लोकांना पाहाण्यासाठी ठेवण्यात आले होते. 1 फूटा पासून 80 फूटापर्यंत मोठे नरकासुर यंदा पाहायला मिळाले. यंदा मासे टिकवून ठेवण्यासाठी वापरल्या जात असलेल्या फॉर्मेलिनचा विषय नरकासूर स्वरुपात बघायला मिळाला.

अनेक ठिकाणी श्रीकृष्ण विजयोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. रात्री उशिरा हजारो नरकासुरांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला. नरकासुर पाहाण्यासाठी गर्दी व्हावी यासाठी डॉल्बी साउंड सिस्टीम आणि आकर्षक प्रकाश योजनेचा वापर करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या