चंद्रावर शांततेत या, कचरा करू नका, चांद्र मोहिमेसाठी नासाचे नवे नियम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नासाने चांद्रमोहीम आणि त्यात सहभागी होणाऱया सदस्य राष्ट्रांसाठी नवे नियम जारी केले आहेत. चांद्र मोहिमेदरम्यान कोणतेही अतिक्रमण किंवा वाद नको, चंद्राच्या पृष्ठभागावर कचरा करू नये तसेच अपोलो 11 यानाच्या ट्रंक्विलिटी बेससारख्या ऐतिहासीक चंद्रस्थळांचे जतन करणे आदी नियम अंतराळवीरांना बंधनकारक करण्यात आले आहेत. या नियमावलीचे भंग करणाऱयांना मोहीम सोडून जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

नासाने चंद्राला कवेत घेण्यासाठी आर्टेनिस मिशन नुकतेच जाहीर केले आहे. 1972 सालच्या अपोलो चांद्र मोहिमेनंतर पुन्हा 2024 मध्ये मानवाला चंद्रावर पाठवण्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प नासाने राबवण्याचे ठरवले आहे. चंद्रावरील मानवी मोहिमांसोबतच चंद्राच्या पृष्ठभागाच्या उत्खननाचीही योजना नासाच्या या कार्यक्रमात आहे. आर्टेमिस मिशनमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, क@नडा, इटली, जपान, लक्समबर्ग आणि युके आदी आठ देशांचा समावेश आहे. आर्टेनिस मिशनमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांसाठी नासाने मंगळवारी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली.

काय आहे नियमावली
– प्रत्येकाने शांततेत यावे
– गोपनीयता न बाळगता लाँच करण्यात आलेल्या सर्व वस्तूंची ओळख आणि नोंद आवश्यक
– आपत्कालीन परिस्थितीत सर्व सदस्यांचे सहकार्य अपेक्षित
– अंतराळ प्रणाली ही वैश्विक असावी, जेणेकरून सर्व उपकरणे सुसंगत राहतील. परस्परांना शास्त्राrय माहिती पुरवली पाहिजे.
– रोव्हर्स किंवा अन्य यान एकमेकांच्या जवळ येऊन परस्परांना धोकादायक ठरणार नाही, याची खबरदारी आवश्यक
– नियमभंग करण्यांना मोहीम सोडून जावे लागेल.