
सोलापूर जिह्यात कोरोनाची स्थिती अगदी नियंत्रणात असून सध्या पाच-दहा रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनापासून बचाव होण्यासाठी आता नाकावाटे देण्यात येणारी लस दोन दिवसांत जिह्यात उपलब्ध होणार आहे. सध्या 60 कर्षांवरील ज्येष्ठांना ही लस देण्यात येणार असून ती मोफत असणार आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने शासनाकडे मागणी केली असून, पहिल्या टप्प्यात 800 लसींचा साठा मिळणार आहे.
नाकावाटे दिली जाणारी ही लस साठ वर्षांवरील नागरिकांना देण्यात येणार आहे. ज्या ज्येष्ठांनी बूस्टर डोस घेतला आहे, अशांना याची गरज नाही. शासनाच्या आरोग्य विभागाकडून तिसऱयांदा लसीकरण मोहीम हाती घेण्याचे नियोजन सुरू आहे. अद्यापि जिह्यातील दोन ते अडीच लाख लोकांनी आणखी लस घेतलेली नाही. पहिल्या टप्प्यात पहिला व दुसरा डोस देण्यात आला. दुसऱया पट्टय़ात प्रिकॉक्शन डोस म्हणून बूस्टर डोसची मोहीम राबविण्यात आली.
राज्यात कोरोना आजाराच्या रुग्णांची वाढती संख्या व झालेल्या मृत्यूचे विश्लेषण केले असता, कोविड 19 मुळे मृत्यूचे प्रमाण हे 60 वर्षांखालील नागरिकांमध्ये जास्त असल्याचे दिसून येते. त्यासाठी 60 वर्षांकरील नागरिकांच्या प्रिकॉर्शन डोससाठीच वापरण्यात येणार आहे. ही लस मोफत दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर मागणीनुसार लस पोहोचविण्यात येणार आहे. एका कुपीमध्ये दोनजणांना डोस दिला जाईल.
अनेकांनी एकही डोस घेतलेला नाही
मध्यंतरी कोरोनाची स्थिती पूर्णतः आटोक्यात आली होती. त्यामुळे लसीकरण मोहीमही मंदावली होती. अनेकांनी लसीचा एकच डोस घेतला आहे. काहींनी एकही डोस घेतला नसल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीकरून लक्षात येते. लसीकरणाचे उद्दिष्ट – 34 लाख 14 हजार 400 पहिला डोस घेतलेले – 32 लाख 62 हजार 931. दुसरा डोस घेतलेले – 24 लाख 50 हजार 387 प्रिकॉर्शन डोस – 1 लाख 81 हजार 831.
शासनाच्या नव्या सूचनेनुसार ही लस केवळ बूस्टरसाठीच नाही, तर पहिला आणि दुसरा डोस घेणाऱयांसाठीही राहणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्यापि लसीचा एकही डोस घेतला नाही. अशांनाही कोरोनापासून संरक्षणासाठी ही लस घेता येणार आहे. या लसीचे चार-चार थेंब नाकात टाकण्यात येतील. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी पुन्हा दुसरा घ्यावा लागेल. नंतर सहा महिन्यांनी हाच डोस बूस्टर डोस म्हणून दिला जाणार आहे. ही लस सुरुवातीला 60 कर्षांच्या वरील नागरिकांना मोफत दिली जाणार आहे.
– डॉ. अनिरुद्ध पिंपळे, समन्वयक.



























































