नाशिक – खालप येथे आगीत 25 ट्रॉली चारा भस्मसात

313

देवळा तालुक्यातील खालप येथे मंगळवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत 25 ट्रॉली मक्याचा चारा जळून खाक झाला. खालप येथील मिनाक्षी केशवराव सूर्यवंशी यांनी घराशेजारील शेतगट क्रमांक 133 मध्ये पंचवीस ट्रॉली भरेल इतका मक्याचा चारा रचून ठेवला होता. तेथे मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने चाऱ्यासह मक्याचा भुसा, बांबू, ठिबक सिंचन संच जळाले. हे नुकसान दोन लाखांच्या घरात आहे. सटाणा येथील अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. तलाठी दिलीप कदम यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मात्र, आगीमागचे निश्चित कारण समजू शकलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या