
येवला तालुक्यातील चिचोंडी खुर्द येथील औद्योगिक शिवारात मंगळवारी सायंकाळी प्रॉपर्टीच्या वादातून अफगाणिस्तान येथील शरणार्थी युवकाची अज्ञात आरोपींनी गोळय़ा घालून हत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून आरोपी हत्या केल्यानंतर फरार झाले असून शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी सायंकाळी 7 वाजता चिचोंडी खुर्द येथील औद्योगिक वसाहतीत अज्ञात आरोपींनी अफगाणिस्तान येथील सुफी खाँजा सय्यद जरीफ चिस्ती याची गोळय़ा घालून हत्या केली. यात सूफी खाँजा हा जागीच ठार झाला. आरोपींनी यावेळी फिर्यादी अफजल अहमद खान व त्याचा भाऊ यांनाही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र ते यावेळी बचावले. आरोपी कार आणि मोबाईल घेऊन फरार झाले. सदरची हत्या ही प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याचा कयास असून आरोपींच्या तपासासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली.




























































