
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यापासून अवघ्या काही मीटर अंतरावर स्फोट झाला. या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही एका तरुणाने फटाका लावल्यामुळे हा स्फोट झाल्याचे नंतर उघडकीस आले. नालंदा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार हे जनसंवाद कार्यक्रमाला उपस्थित होते त्यावेळी शुभम कुमार याने मंचापासून काही अंतरावर फटाके लावले. याप्रकरणी पोलीसांनी शुभम कुमार याला ताब्यात घेतले असून आणखी तपास सुरु असल्याचे नालंदाचे पोलीस अधीक्षक अशोक मिश्रा यांनी सांगितले.

























































