
सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा
रयत शिक्षण संस्थेचे,तु.ह.वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शनिवार येथे संस्था शताब्दी महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा व सत्कार सोहळा संपन्न झाला. कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेने ऑक्टोबर महिन्यात शंभराव्या वर्षात पदार्पण केले.यानिमित्त फुंडे हायस्कूल मध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.विद्यालयाचे चेअरमन व माजी विद्यार्थी कृष्णाजी कडू साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयातून शिक्षण घेवून बाहेर पडलेले व विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते. कर्मवीर अण्णा व वाजेकर शेठ यांच्या प्रतिमापूजनाने या मेळाव्याची सुरवात झाली. माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख श्री.आर.एल.प्रक्षाले यांनी हा मेळाव्याचे प्रास्ताविक सादर केले.त्यानंतर उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यामध्ये जिल्हा परिषद सदस्य .विजय भोईर,पंचायत समिती सदस्य.दिपक ठाकूर,सुरेश म्हात्रे.जगजीवन भोईर.गोपाळ पाटील, पंडित सर,संदीप पाटील,.दामुशेठ घरत,.महादेव घरत इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व शाळेच्या जुन्या आठवणी सांगितल्या.
आपल्या शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनीपुढे येवून काही उपक्रम राबवावेत असा निश्चय यावेळी माजी विद्यार्थांनी केला. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य मोहन पाटील, उपमुख्याध्यापक ए.एम.जरे, पर्यवेक्षक आर.पी.ठाकूर, जे.सी.गोडगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख.दर्शना माळी, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष दिपक ठाकूर आणि सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली आणि हा मेळावा यशस्वीरीत्या पार पाडला.






























































