
मेरे नशीब से पेट्रोल-डिझेल के दाम कम हो रहे है, असे पतंप्रधान नरेंद्र मोदी आधी म्हणायचे. मग आता कुणाच्या नशिबाने भाव वाढत आहेत. तुमच्या की जनतेच्या नशिबाने, कोण बदनशिबी आहे, आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नरेंद्र मोदी यांना केला आहे.
देशात आज पेट्रोल-डिझेल, सीएनजी, एलपीजीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पेट्रोल-डिझेलच्या मुद्दय़ावर भाजपने निवडणूक लढवली होती. अब की बार, मोदी सरकार असे बोलत सत्तेवर आल्यानंतर काही काळ भाव कमी केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी मेरे नशीब से पेट्रोल-डिझेल के दाम कम हो रहे है, तो विपक्ष को क्यू बुरा लगता है, आपको नशीबवाला चाहिए की बदनशीबवाला चाहिए, असे बोलून विरोधकांना डिवचले होते. तोच मुद्दा उचलून धरत नवाब मलिक यांनी प्रंतप्रधानांवर टीका केली आहे.

























































