भाकरी फिरवणार होतो पण भाकरीच थांबली, राजीनामा मागे घेत पवारांचं सूचक वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत ते आपला राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाकरीवरून एक वक्तव्य केलं. भाकरी फिरवणार होतो पण भाकरीच थांबली, असं शरद पवार म्हणाले. यावरून पुन्हा एकदा शरद पवार यांच्या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईत युवक काँग्रेसच्या युवा मंथन कार्यक्रमात बोलत असताना शरद पवार यांनी ”भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, भाकरी फिरवली नाही तर ती करपते.” असे वक्तव्य केले होते. त्यावरून अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. मात्र जेव्हा शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशनात राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा कार्यकर्त्यांना भाकरीच्या वक्तव्याचा संदर्भ लागला. त्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला.