
केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी कुणाची? यावरून दावे प्रतिदावे सुरू आहेत. सर्वाधिक आमदार आपल्याकडे असल्याचे सांगत अजित पवार यांनी पक्षावर दावा केला आहे. त्यातच अजित पवारांसोबतचे 15 आमदार संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना केला आहे.
राष्ट्रवादीतून बाहेर गेलेल्या अनेक आमदारांना पक्षात पुन्हा येण्याची इच्छा आहे. जवळपास 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. पण त्यांना परत पक्षात घ्यायचे किंवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील. याबाबत अधिक खोलात जाऊन त्यांना अडचणीत आणणं मला योग्य वाटत नाही. आज त्यांची अडचण होऊ नये, त्यांची कामे होणे आवश्यक आहे. योग्यवेळ पाहू आणि काय ते जाहीर करू, असे जयंत पाटील म्हणाले.






























































