राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

63

सामना प्रतिनिधी । घनसावंगी

शिवसेना सहसंपर्पप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घनसावंगी मतदारसंघातील सहा गावांतील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्पप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या घनसावंगी येथील संपर्क कार्यालयात सकाळपासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रांतील  मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता उपस्थित होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करणाऱयांमध्ये पारडगाव येथील राष्ट्रवादीचे माजी सरपंच सय्यद मुमताज, विक्रम पुरेशी, हबीब पुरेशी, विष्णू सुतार, मुश्ताक पटेल, नजीर पुरेशी, इकबाल पुरेशी, अखिल पुरेशी, अक्षय अढाव, ताहेर, कलाम पुरेशी यांच्यासह ३० कार्यकर्त्यांचा समावेश होता, तर राहेरा येथील आत्माराम कोरडे, गजानन कोरडे, दादासाहेब कोरडे, अक्षय कोरडे, संभाजी गायकवाड, बद्रीनाथ गायकवाड, रामप्रसाद गायकवाड,  पांगरा येथील राजू, राजाराम वाघ्राळ, शामराव लांडगे, आबासाहेब वाघ्राळ, बंडू आढे, गणेश लांडगे, येवला येथील पैलास राठोड, अमोल पवार, राम राठोड, संदीप पवार, जाधव, ज्ञानेश्वर राठोड, घोंसी येथील शेख मुन्सी शेख बशीर, शेख बाबू, अंतरवाली  येथील रामकिसन  माकोडे, दत्ता गोरे या सर्व प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे डॉ. हिकमत उढाण व उपनेते लक्ष्मण  वडले यांनी स्वागत केले. शिवसेना साखर कारखान्याची निवडणूक लढवणार असल्याचे उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी सांगितले.

यावेळी उद्धव मरकड, पंकज  सोळुंके, शाम उढाण, बापूसाहेब देशमुख, शालिकराम पवार, रणजित उढाण, खालिद पुरेशी, पंढरीनाथ उगले, अनिरुद्ध शिंदे, रमेश बोबडे, पुरुषोत्तम उढाण, दत्ता बेंद्रे, श्रीपृष्ण बोबडे, अशोक शेलारे, विनोद चव्हाण यांच्यासह अनेक शिवसैनिक व हितचिंतकांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या